चिंचवड येथून अख्खे कुटुंब बेपत्ता

‘त्या’ चिठ्ठीमुळे परिसरात खळबळ, पोलीस तपास सुरु 

पिंपरी – चिंचवडच्या मोहननगर परिसरातून एक व्यवसायिक कुटुंबासह गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संतोष एकनाथ शिंदे (वय-47) त्यांच्या पत्नी सविता संतोष शिंदे (वय-41), मुलगा मुकुंद शिंदे (वय-22), मुलगी मैथाली शिंदे (वय-18) असे सर्व बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी संतोष यांचे भाऊ नितीन एकनाथ शिंदे (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या एकूण दहा गाड्या आहेत. शिंदे यांनी धंदा व इतर कामांसाठी विविध ठिकाणाहून तब्बल दोन कोटीच्या आसपास कर्ज काढले होते. यासाठी त्यांनी खासगी पतसंस्था तसेच कर्जदारांचे पैसे परत मागण्यासाठी फोन येत होते. या त्रासाला कंटाळून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. शिवाय त्यांनी राहत्या घरावर कर्ज काढण्याचा मानस देखील त्यांच्या नातेवाईकांना बोलून दाखवला.

मात्र, 5 डिसेंबर रोजी सारे कुटुंब घरातून जाण्यासाठी निघाले. यावेळी भावाने हटकले देखील मात्र त्यांनी फिरायला जातोय असे सांगितले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांचा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ सोडले. त्यानंतर ते कुटुंबीय रिक्षाने बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी कुटुंबीय घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र त्यातील एकही जण फोन उचलत नव्हते. अखेर ते राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला असता चौघांचेही फोन घरातच होते. यावेळी घरच्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये शिंदे यांनी लिहिले होते की, माझ्या साऱ्या व्यवहाराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी माझा परिवार आत्महत्या करत आहोत. चिठ्ठी शेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या.

मुलाची परीक्षा तोंडावर
मुकुंद हा मेकॅनिकल इंजिनिअरींग करत आहे. तर मुलगी मैथाली ही बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. मुकंदची इंजिनिअरींगची परीक्षा तोंडावर असतानाच हे कुटुंब बेपत्ता झाले आहे. पोलीस सर्व बाजुंनी तपास घेत असून अद्याप तरी पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, या घटनेमुळे शिंदे यांचे नातेवाईक पूर्णपणे खचले आहे. त्यांनीही शोध सुरु केला असून कोणाकडेही या कुटुंबाची माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)