चिंचवड येथील बीएसएनएल टॉवरची विद्युत सेवा महावितरणकडून बंद

पिंपरी- चिंचवड येथील बीएसएनएल टॉवरची विजसेवा महावितरणकडून बंद करण्यात आली आहे. विजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बीएसएनएल कंपनीकडून सतत बिलाची थकबाकी होत असल्याने महावितरणकडून चिंचवड येथील बीएसएनएल टॉवरची विद्युतसेवा बंद करण्यात आली आहे. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे याच भागात असलेल्या पोलीस आयुक्तालयाला सुद्धा इंटरनेट सुविधेची झळ बसत आहे. मात्र, पोलीस आयुक्तालयाकडून याबात कुठलीही इंटरनेट सेवा बंद झाली नसल्याचे आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बीएसएनएल टॉवरच्या 5 कनेक्‍शनचे 2 लाख 47 हजार बिल थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत महावितरण विभागाशी विचारणा केली असता जोपर्यंत थकबाकी केली जाणार नाही, तोपर्यंत विद्युत जोडणी केली जाणार नसल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे बीएसएनएल टॉवरच्या परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. या टॉवर वरुन आयुक्तालयासह प्रेमलोक पार्क परिसरात इंटरनेट सेवा पुरवली जाते. बीएसएनएल कंपनीकडून फंड जमा होण्यास विलंब होत असल्याने ही समस्या उद्भवली आहे. याबाबत अप्पर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे म्हणाले की, बीएसएनएल टॉवरची विद्युतसेवा महावितरणकडून जरी तोडली असली तरी, पोलीस आयुक्तालयाच्या इंटरनेट सेवेवर काही फरक पडला नसून आमचे इंटरनेट सुरळीत सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)