चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात ब्रह्मविद्येवर व्याख्यान

पिंपरी – ब्रह्मविद्येची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 30 जनू रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता ओळख ब्रह्मविद्येची प्रात्यक्षिकसहीत व्याख्यान आयोजित केले आहे.

अस्थमा, श्‍वसनसंस्थेचे इतर विकार, उच्च रक्तदाब, डायबेटिस, हृदयविकार, मानदुखी, पाठदुखी, जुनाट व सतत असणारी सर्दी अशा अनेक विकारांवर ब्रह्मविद्येचा उत्तम परिणाम दिसून येतो. शिवाय साधनेने दृष्टिकोन बदलतो आणि अधिक आनंदी, उत्साही व आत्मविश्‍वास संपन्नता अंगी येते. ताण-तणावातून मुक्त होतो. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारल्याने आपले दैनंदिन काम उत्साहाने व चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे नोकरीत, व्यवसायात, किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ब्रह्मविद्येचे महत्व अनण्यसाधारण आहे.

कार्यक्रमात ब्रह्मविद्येच्या तंत्राच्या सरावाने काय फायदा झाला, याविषयी साधक आपले अनुभव सांगणार आहेत. ब्रह्मविद्या साधक संघाचे विश्‍वस्त व ज्येष्ठ शिक्षक संजय साठे ब्रह्मविद्येबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)