चिंचवड येथील पवना सहकारी बॅंकेचा वर्धापन दिन साजरा

 

पिंपरी– चिंचवड येथील पवना सहकारी बॅंकेचा 45 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. बॅंकेच्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या ठेवी असून 20 शाखांत बॅंकेचा विस्तार झाला आहे. बॅंकेच्या दोन नवीन शाखा लवकर सुरू होत आहेत, अशी माहिती संस्थापक-अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. उपाध्यक्ष जयनाथ काटे, संचालक विठ्ठल काळभोर, अमित गावडे, गोरक्षनाथ काळे, शांताराम गराडे, शिवाजी वाघेरे, तुकाराम काळभोर, शकुंतला साठे, संभाजी दौंडकर, शामराव फुगे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, गणेश पिंजण, शरद काळभोर, नितीन नाणेकर, सचिन चिंचवडे, राजशेखर डोळस, जयश्री गावडे, नितीन लांडगे, सभासद राजेश मोरे, उर्मिला काळभोर, बाळकृष्ण उऱ्हे, ऍड. सुनील आवारे, सदाशिव नाणेकर, विलास मेमाणे, विनायक भोंगाळे, प्रदीप तायडे, रंगनाथ फुगे, विजय फुगे, उप मुख्य अधिकारी मनेश बोऱ्हाडे, नितीन कोकणे, किरण शेळके, सभासद, कर्मचारी, खातेदार व बॅंकेचे हितचिंतक यावेळी उपस्थित होते. बॅंकेचे संचालक वसंत लोंढे यांनी प्रास्ताविक व व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)