चिंचवड भागातील पाणी पुरवठा विस्कळीत

पिंपरी– चिंचवड भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. ाबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चिंचवडमधील काही भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बिजलीनगर, रस्टन कॉलनी, पवनानगर, चिंचवडगाव येथील अनेक भागातील नागरिकांना नेमक्‍या गौरीगणपतीच्या सणामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या भागामध्ये पाण्याचा दाब अतिशय कमी असून पाणी येण्याची वेळ निश्‍चित नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. धरणसाठा कमी असताना महापालिकेच्या वतीने एक दिवसाआड पाणी येत होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. धरण शंभर टक्के भरले असताना पाण्याची कुठलीही कमतरता नसताना पाणीपुरवठा विभागाकडून सुरळीत पाणीपुरवठा का होत नाही? असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा शक्‍य तेवढ्या लवकर सुरळीत करावा, अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)