चिंचवड ठरला सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ

आंबेगाव लहान : प्रारूप मतदार यादी जाहीर

पुणे – जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 71 लाख 89 हजार 265 झाली आहे. तर 20 हजार 264 नव मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदारांच्या संख्येनुसार जिल्ह्यातील सर्वांत मोठा विधानसभा मतदारसंघ चिंचवड आहे. तर सर्वांत लहान मतदारसंघ आंबेगाव आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्र मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये 71 लाख 89 हजार 265 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. या मतदार यादीतील नावांबाबत काही हरकती असतील तर निवडणुक निर्णय अधिकऱ्यांकडे नोंदविता येणार आहे. एक जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र राहणार आहे. विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम 31 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत सुरू राहणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 4 लाख 67 हजार मतदार असून, त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 4 लाख 51 हजार मतदार, हडपसर मतदारसंघात 4 लाख 45 हजार मतदार तर वडगावशेरी मतदारसंघात 4 लाख 21 हजार मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये शिरूर, बारामती, भोर, मावळ, पिंपरी, भोसरी, कोथरुड, पर्वती या विधानसभा मतदारसंघात तीन लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)