चिंचवड खून प्रकरणी सराईताला अटक

पिंपरी – चिंचवड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. प्रफुल्ल ढोकणे असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (वय 24, रा. पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रणजित बाबू चव्हाण (वय 27, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय 23, रा भोई आळी, चाफेकर चौकाजवळ, चिंचवडगाव), सोन्या वराडे हे तीन आरोपी फरार आहेत.

आकाश आणि रणजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद होता. मंगळवारी रात्री आकाश दुचाकीवरून जात होता. चापेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. कोयता आणि रॉडने आकाशच्या पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला. फरार गुन्हेगारांचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)