चिंचवड उड्डाणपुलाखालील मार्ग कधी होणार खुला?

चिंचवड – चिंचवड रेल्वे स्टेशन कडून पारिजातबन कडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचवड उड्डाणपुलाच्या बोगद्याचा स्लॅब ढासळू लागल्याने हा मार्ग तीन आठवड्यांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महापालिकेने बोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

अवजड तसेच जास्त उंचीच्या वाहनांना चिंचवड उड्डाणपुलाच्या बोगद्याखालून वाहतुकीस मनाई आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन सर्रास या मार्गातून ही वाहने धावतात. त्यामुळे अनेकदा वाहने अडकण्याचे प्रकार घडले. जास्त उंचीच्या वाहनांचा वरील भाग वारंवार घासून बोगद्याच्या स्लॅबचा भाग ढासळायला सुरूवात झाली होती. त्यामुळे हा मार्ग 28 जानेवारी 2018 पासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने बोगद्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. चिंचवड रेल्वे स्थानकाच्या पश्‍चिम बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून दळवीनगर परिसरातून येणारी वाहने तसेच सुदर्शन नगर, तानाजी नगर, पिंपरी भागातून चिंचवड रेल्वे स्थानकाकडे दुचाकी, चारचाकी, रिक्षातून जाणारे प्रवासी तसेच दळवीनगर आकुर्डी भागाकडे जाणाऱ्या वाहनांना हा मार्ग सोईस्कर ठरतो. मात्र हा मार्ग बंद होवून तीन आठवडे उलटले आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत असून दूरचा वळसा घालून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. तसेच चिंचवड येथील लोकमान्य रूग्णालयासमोरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हे काम अंतीम टप्प्यात आले असून लवकरच हा मार्ग खुला होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)