चिंचवडला गुरूवारी श्रम-उद्योग परिषद

पिंपरी – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 26) श्रम-उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर सभागृहात दुपारी साडेचार वाजता होणाऱ्या या परिषदेचे उद्‌घाटन उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ समिक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त व्यवस्थापक मनोहर पारळकर, भूमी इन्फ्राकॉनचे संचालक सुरेश शिरूडे आदी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ समाजवादी स्वर्गीय भाई वैद्य यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला “श्रम सारथी पुरस्कार’ राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांना प्रदान करण्यात येणार आहे.

भोसरीतील शर्मा प्रेसिंग वकर्सचे एस. एस. शर्मा यांना “महाराष्ट्र उद्योग मित्र’, तर चिखलीतील रॉयल टुलिंग इंडस्ट्रीजचे महम्मद युनूस डांगी यांना “महाराष्ट्र उद्योग भुषण’ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. रांजणगाव येथील स्वरोव्हस्की कामगार संघटनेला कामगार हितसंवर्धन कामगार संघटना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त राजु कुमार, बापू माने, रमेश टाक, कौसल्या वाघमारे, रामदास कलापुरे, सुजाता पंडीत, किसन नांगरे, बाबू गायकवाड आणि लता रसाळ या उपेक्षित कष्टकऱ्यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. “कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल’ हा परिसंवाद होणार असून भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिप्रेत असलेला कामगार व कामगार संघटना यावर चर्चा होणार आहे. आयुष्याची वाट तुडवणाऱ्या उपेक्षित कष्टकऱ्यांची प्रकट मुलाखत या प्रसंगी घेण्यात येईल, अशी माहिती रोहीत खर्गे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)