चिंचवडमध्ये “स्वाईन फ्लू’ जनजागृती फेरी

पिंपरी – संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव परिसरात स्वाईन फ्लू जनजागृती फेरी काढण्यात आली.

चापेकर चौक, गांधी पेठ, भैरवनाथ मंदिर, राम मंदिर, मोरया गोसावी मंदिर, पडवळ आळी, भाजी मंडई या भागातून फेरी काढत स्वाईन फ्लूपासून बचावासाठी घेण्याच्या काळजीविषयी प्रबोधन करण्यात आले. डॉ. डी. वाय इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे 30 विद्यार्थी सहभागी झाले होते.

एकुण 90 स्वयंसेवकांनी जनजागृती केली. यावेळी हातात फलक घेऊन नागरिकांनी ताप आल्यास घाबरुन न जाता डॉक्‍टरांचा सल्ला घ्या, गरम पाण्याची वाफ घ्या, भरपूर पाणी प्या, भरपूर विश्रांती घ्या, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या, असे आवाहन करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)