चिंचवडमध्ये रविवारी “कलासंगम’ सोहळा

पिंपरी – कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त कलारंग संस्था आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 15) कलासंगम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभिनेत्री आशा नेगी, नृत्यांगना सुप्रिया धाईंजे, निवेदीका सरोज राव, सुमीत काटकर, दिनेश मारणे, केतन लोंढे आदी यावेळी उपस्थित होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजता हा सोहळा रंगणार असून यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सुमारे 165 कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्य, गायन, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, निवेदन, छायाचित्रकार आदींसारख्या विविध क्षेत्रातील मंडळीचा सन्मान केला जाणार आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेब भोईर, नंदकिशोर कपोते, प्रवीण तुपे, डॉ. सतिश गोरे, बाळ जुआटकर, राजन लाखे, सतिश वर्तक, किरण येवलेकर, तेजश्री अडिगे, संजय कांबळे, राज आहेरराव, वैशाली पळसुले, दत्तोबा पाचंगे, देवदत्त कशाळीकर, नाना शिवले या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड मधील स्थानिक कलाकारांचा मराठी गाणी, नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)