चिंचवडमध्ये “मोरया युथ फेस्टिवल’

पिंपरी – कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोरया युथ फेस्टिवलचे उद्‌घाटन उद्या (शनिवारी) विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते चिंचवड येथे होणार आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन, सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाउंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी मोरया युथ फेस्टिवलचे आयोजन यांनी केले आहे. उद्‌घाटन सत्रानंतर विश्‍वास नांगरे पाटील युवकांसोबत मुक्त संवाद साधणार असल्याची माहिती ऍड. पटवर्धन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)