चिंचवडमध्ये मोबाईल चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी – पायीजाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन मुलाला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 16 मोबाईल फोन जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई भदाने यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ एका नागरिकाला मारहाण करून मोबाईल व पैसे हिसकावणारा मुलगा हा रामनगर झोपडपट्टी येथील पिंपरी बसस्टॉपजवळ उभा आहे. त्यानुसार तपास पथकाने अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. या मुलास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने मित्रांसोबत चिंचवड पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्याने मोबाईल व 620 रुपये रोख हे कोयत्याने मारहाण करून हिसकावल्याचे कबूल केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच त्याच्याकडून निगडी, चिंचवड, चिखली, पिंपरी या ठिकाणाहून मोबाईल स्नॅचिंग केलेले एकूण 16 मोबाईल जप्त केले आहेत. याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव,पोलीस हवालदार पांडुरंग जगताप,पोलीस नाईक स्वप्नील शेलार, विजयकुमार आखाडे, राजेंद्र शिरसाठ, ऋषिकेश पाटील, पोलीस शिपाई पंकज भदाणे, गोविंद डोके,अमोल माने, वंदना गायकवाड यांनी केली. A

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)