चिंचवडमध्ये महापौर चषक कबड्डी स्पर्धा

पिंपरी – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येत्या बावीस नोव्हेंबरपासून महापौर चषक कबड्डी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सुमारे साडे सव्वीस लाख रुपयांचा खर्च महापालिकेला येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशन यांच्या संयुक्त मान्यतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 11, पूर्णानगर, चिंचवड येथील श्री शनि मंदिर मैदानावर हा कबड्डीचा थरार अनुभवण्यास क्रीडा रसिकांना मिळणार आहे. या स्पर्धेत गटनिहाय पुणे शहराबाहेरील पुरूषांचे 12, तर महिलांचे 8 आणि पुणे शहरातील पुरूषांचे 18, तर महिलांचे 12 असे एकूण पन्नास संघ सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेसाठी मैदान तयार करणे, स्टेज, टेबल, आसन व्यवस्था, गॅलरी खर्च, खेळाडू निवास व्यवस्थेवर येणारा खर्च महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाकडून, तर स्पर्धेच्या ठिकाणी विद्युत, स्पिकर व माईक व्यवस्था, महिला व पुरूष खेळाडू निवास व्यवस्था ठिकाणी लाईट व्यवस्था करणे, तसेच स्टॅंड पेन उपलब्ध करणे आदींसाठी 26 लाख 50 हजार 860 रुपये इतका खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून हा खर्च करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)