चिंचवडमध्ये फार्मासिस्ट दिन साजरा

पिंपरी – फार्मासिस्ट हा देशाच्या आरोग्य क्षेत्रातील कणा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले.

चिंचवड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. धन्वंतरीचे पूजन केल्यानंतर फार्मासिस्ट प्रतिज्ञा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुशील शहा, उपाध्यक्ष विवेक तापकीर, डॉ. आत्माराम पवार, डॉ. मनोहर पाटील, प्रशांत हंबर, अजय दर्डा, अमोल शिनकर, तुषार कांकरिया, मनोज प्रभू आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्यस्थितीतील फार्मसी व ती कशी असावी यावर विवेक तापकीर यांनी तयार केलेली शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. आत्माराम पवार, प्रशांत हंबर, मनोहर पाटील, विजय पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्वप्नील जंगम व शारदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. विवेक तापकीर, रवी पवार, प्रसाद शितोळे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)