चिंचवडमध्ये दोन दिवसीय “टॅलेंट हंट’ महोत्सव

File Photo

चिंचवड – लायन्स क्‍लब इंटरनॅशनल प्रांत 3234 डी 2 आणि नृत्यतेज ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक संवर्धनाच्या उद्देशाने 28 व 29 एप्रिल 2018 या दोन दिवसीय लायन टॅलंट हंट 2018 आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लायन्स क्‍लब व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख तेजश्री अडिगे यांनी दिली आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 28 व 29 एप्रिल 2018 हे दोन दिवस जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून हा नृत्य महोत्सव होणार आहे. लहान मुलांकरिता व युवकांकरिता लायन रायझिंग स्टार या स्पर्धेअंतर्गत वाद्य वादन, गीत गायन, एकपात्री अभिनय आणि सोलो नृत्य प्रकार असणार आहे.

-Ads-

लायन आयकॉन या व्यक्तिमत्व स्पर्धेत युवक, युवती आणि महिलांचा सहभाग असेल. बालकांचा वयोगट 6 ते 9, युवकांसाठी 10 ते 15 व 16 ते 28 आणि महिलांसाठी खुला गट असणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 24 एप्रिल रोजी चिंचवडच्या प्रतिभा कॉलेजमध्ये प्राथमिक फेरी होणार आहे. नोंदणीसाठी संयोजक तेजश्री अडिगे 9823060331, उमा पाटील 9881576676 अथवा सीमा पारखे 9527662255 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)