चिंचवडमध्ये दोन गटात हाणामारी

चिंचवड – गाडी चालविण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास प्रेमलोकपार्क चिंचवड येथे घडला.

सिद्धार्थ रवींद्र मोरे (वय-19, रा. तानाजीनगर, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजार्थ सुजित सिंग, आशिष, बाप्या, लाल्या (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. दळवीनगर, चिंचवड) आणि अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि त्याचे मित्र चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे क्रिकेट खेळत होते. त्यावेळी सिद्धार्थ आणि राजार्थ यांच्यात गाडी चालविण्यावरून भांडण झाले. त्यावरून राजार्थ आणि त्याच्या मित्रांच्या सिद्धार्थचे मित्र आकाश राठोड याला लोखंडी रॉडने मारहाण केली. तर हर्षल पाठक याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

निखिल चिंचवडे याला कोयत्याने व लोखंडी रॉडने मारले. यामध्ये निखिल गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, महिला पोलीस उपनिरीक्षक यु. पी. देशमुख या अधिकाऱ्यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. डिगे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)