चिंचवडमध्ये आंबा महोत्सव

चिंचवड – धनश्री बचत गट व किर्ती बचत गटाच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 16 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या बेसमेंटमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक असा “महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव’ आयोजित केला आहे.

आयोजक आरती रवि सहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तृतीयेला आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याचा फायदा परप्रांतीय फिरुन कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस विकून घेत आहेत.

यास प्रतिबंध बसावा आणि ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस ओळखता यावा, यासाठी आंबा महोत्सवामध्ये आंबा ओळखण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवामध्ये कोकणातील आंबा उत्पादक त्यांच्या बागेतील आंबा थेट ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार आहेत. त्याचबरोबर बचत गटातील महिलांनी तयार केलेली अनेक उत्पादने देखील उपलब्ध असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)