चिंचवडमध्ये अपहृत मुलीची सुखरुप सुटका

पिंपरी – चिंचवड येथून बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हिंजवडी नजीकच्या नेरेगावातून मुलीची सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला ५० लाखांची खंडणी मागितली होती.

माही अवध जैन (वय ६) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी नितीन सत्यवान गजरमल (वय-२५, देवगाव, ता. परंडा, जी. उस्मानाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय-२१, रा. थेरगाव, वाकड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१५) दुपारी चिंचवड येथील क्वीन्सटाउन सोसायटी शेजारील एका दुकानात माही पेन आणण्यासाठी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. यावेळी माहीने आरडा ओरडा केल्याने एक दुकानदाराने कारचा पाठलाग केला होता. मात्र काही अंतरावर कारने त्यांना चकवा दिला.

दुकानदाराने माहीचे अपहरण झाल्याचे परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांस फोनवर सांगितले. त्याने थेट आयुक्तांना फोन करून घटना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्तांनी स्वतः सूत्रे हातात घेत अधिकऱ्यांना सूचना केल्या. आयुक्तांच्या आदेशानुसार अवघ्या काही मिनिटातच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथके, इतर पोलीस ठाण्याची पथके तपासासाठी रवाना झाली. शहरात ठिक-ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना एका मेडिकलच्या कॅमेरामध्ये कार कैद झाली.

एकीकडे शहरातील लॉज तपासण्याचे काम सुरू असताना पोलिसांची एक टिम तांत्रिक तपासात व्यस्त होती. पोलिसांना अपेक्षित असलेली चूक अपहरणकर्त्यांनी केली. मुलीच्या पालकांना आठ वाजता ५० लाखांच्या खंडणीसाठी त्यांनी फोन केला. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाचा आधार घेत मुलीला ज्या ठिकाणी ठेवले होते ते ठिकाण शोधून काढले. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे दीडच्या सुमारास नेरे गावातून त्या मुलीची सुखरूप सुटका केली. आरोपीने राहत्या घरात मुलीला कोंडून ठेवले होते.

आरोपींनी झटपट पैसे कमावण्यासाठी हा मार्ग निवडला. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी नुकतेच ४० हजारांची जुनी कार घेतली होती. माही हे त्यांचे टार्गेट नव्हते. मात्र एखाद्या उच्चभ्रू सोसायटीतील मुलगी पळवून नेल्यास चांगले पैसे मिळतील असा त्यांचा समज होता. त्यासाठी क्विन्स सोसायटीबाहेर त्यांनी गेल्या आठ दिवसापासून सापळा रचला होता. सुरवातीला त्यांनी ५० लाख इतकी खंडणी मागितली होती. मात्र इतके पैसे देणे शक्य नसल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितल्यानंतर शेवटी १५ लाख देण्याच्या बोलीवर त्यांनी मुलीला सोडण्याचे मान्य केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)