चिंचणीत शेतकऱ्यांची आत्महत्या

शिरूर- चिंचणी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.4) सायंकाळी 5च्या सुमारास घडली आहे. मुलीचे लग्न जवळ आले असून इतर कर्ज झाल्याने हे कृत्य करत असल्याचे चिठ्ठी म्हटले आहे. दशरथ भीमराव चव्हाण (वय 42, राहणार चिंचणी, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी शनिवारी (दि.6) शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी भेट देऊन याबाबत चौकशी करून अहवाल शासनाला पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतकऱ्याचे नातेवाईक रमाकांत शोक दिवटे यांनी दिलेल्या खबरीवरून दिवटे हे घरी असताना त्यांना फोन आला की, दशरथ चव्हाण यांनी त्यांच्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते तात्काळ चिंचणी येथे गेले. त्यांनी याबाबत शिरूर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असता त्यामध्ये त्यांना चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये लग्न जवळ आले असून बाहेरचे कर्ज झाले आहे. त्यामुळेच मी हे कृत्य करत असल्याचे लिहिले आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)