चाहत खन्नाने दारुड्यांना झोडपले

होळीच्या दिवशी टिव्ही ऍक्‍ट्रेस चाहत खन्नाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. होळीच्या धुंदीमध्ये असलेल्या 10-15 दारुड्यांना चाहत खन्नाच्या कारला घेरले आणि ड्रायव्हरला मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. कारची स्क्रीन शील्डही फोडून टाकली. ही घटना मालाडच्या जवळ संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

आपल्या कारवर दारुड्यांनी हल्ला केल्याचे बघून चाहत खन्नाने त्वरित पोलिसांना फोन केला. मात्र दारुड्यांनी जेंव्हा ड्रायव्हरला मारहाण करायला सुरुवात केली, तेंव्हा ती गप्प बसू शकली नाही. तिने आपल्या ड्रायव्हरच्या संरक्षणासाठी चक्क या गुंडांना चोपायला सुरुवात केली. तिने या सर्वांना अक्षरशः चपलेने चोपून काढले. तिच्या या दबंगगिरीची सोशल मिडीयातून खूप चर्चा होते आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. टिव्ही ऍक्‍ट्रेस चाहत खन्नाच्या आईचे अलिकडेच निधन झाले आहे. तर पती फरहान मिर्झापासून ती गेल्याच वर्षी विभक्‍त झाली आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यात नाखूष असल्याचे तिने यापूर्वीही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले होते. “बडे अच्छे लगते है’ आणि “कबूल है’ यासारख्या सिरीयलमधून चाहतने काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)