चासच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील चास येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत चेंडू फेक, धावणे, वक्‍तृत्व, लेझीम, भजन इत्यादी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती आंबेगाव आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवांतर्गत गिरवली केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा चास येथे झाल्या. गिरवली केंद्राच्या केंद्रस्तरीय स्पर्धा संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत गिरवली केंद्रातील चास, गिरवली, चिंचोली, कडेवाडी, जांभळेमळा, गणेशवाडी, ठाकरवाडी, कोंबडवाडी, रामवाडी, नंबरवाडी या शाळेतील 200 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन सरपंच सुजाता बारवे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसरपंच श्रीकांत चासकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बारवे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नानासाहेब बारवे, रामदास बारवे, ए. एफ. इनामदार सर, खंडू बारवे, संजय जाधव, संत ज्ञानेश्‍वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पा भोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंजली येवले व केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी खेळाडूंना शपथ दिली. स्पर्धेचे बक्षिस वितरण विस्तार अधिकारी राजाराम भोंग, केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे, रामदास बारवे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भेके यांनी केले. मुख्याध्यापक भास्कर चासकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)