“चासकमान’मधून उन्हाळी आवर्तन

राजगुरूनगर- चासकमान धरणातून 300 क्‍युसेसने धरणाच्या डाव्या कालव्यात उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन आजपासून (गुरुवारी) सकाळी साडेनऊपासून सोडण्यास सुरुवात झाली असून तब्बल 45 दिवसांचे हे आवर्तन असणार आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करत आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने शेतातील विहिरी तलाव आटल्याने शेतातील नगदी पिके करपू लागली होती. यासाठी धरणाखालील शेतकऱ्यांनी चासकमान धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. धरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा आणि पाणी टंचाईचा आढावा घेत चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 45 दिवसांचे हे आवर्तन आहे.
चासकमान धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडल्याने धरणा खालील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी शेतात केलेल्या उन्हाळ्यातील भुईमूग, बाजरी, तसेच धना, मेथी, मका, आदि पिकांना पाणी देणे शक्‍य होणार असल्याने या पिकांना जीवदान मिळणार आहे. कालवा परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमधील पाणी पातळी वाढणार आहे. सध्या 300 क्‍युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत असून आवश्‍यकतेनुसार 550 क्‍युसेस वेगाने पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 • हे तिसरे आवर्तन
  चासकमान धरणातून यावर्षी आतापर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली आहेत. पहिले आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्यात आले होते. दुसरे आवर्तन फेब्रुवारी महिन्यात सोडण्यात आले होते तर आज (दि.22) तिसरे आवर्तन सोडण्यात आले. उन्हाळी हंगामातील हे पहिले आवर्तन आहे.
 • यंदा नियोजन चांगल्याप्रकारे
  चासकमान धरणात सध्य परिस्थितीत 48.50 टक्के इतका पाणीसाठा आहे. या पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने धरण प्रशासनाने यावेळी केले आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ 36 टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता. उन्हाची तीव्रता आणि उपलब्ध पाणीसाठा याचे नियोजन यापुढेही प्रशानासाने चागले ठेवल्यास पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.
 • एकूण पाणीपातळी : 2642.15 मीटर
  एकूण साठा : 131.23 दलघमी
  उपयुक्‍त साठा : 104.04 दलघमी
  टक्केवारी : 48.50 टक्के

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)