“चासकमान’चा डावा कालवा फुटण्याचा धोका

राजगुरूनग जवळ गळती : दुरुस्ती न करताच सोडले आवर्तन

राजगुरुनगर- चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्याची गेली अनेक वर्षे दुरुस्ती न करता कालव्यामधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे डाव्या कालव्याला ठिकठिकाणी मोठी गळती होत आहे. राजगुरुनगर जवळ या कालव्याला मोठी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे राजगुरुनगर जवळ डावा कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चासकमान धरणाचा डावा कालवा खेड व शिरूर तालुक्‍याला वरदान ठरला आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातही यावर्षी पावसाने दांडी मारल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.असे असताना चासकमान धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यात डाव्या कालव्यातून 500 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चासकमानच्या डाव्या कालव्यावर अनेक ठिकाणी झाडे झुडपे उगवली आहेत. त्यांच्या मुळ्या कालव्याच्या मातीच्या बांधातून पसरल्याने कालव्याला मोठी गळती सुरू झाली आहे. कालव्यातील पूल, बांध यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यातूनही पाण्याची मोठी गळती होत आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्याचे प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याच प्रशासनाला कालव्यातून होणाऱ्या पाण्याची गळती दिसत नाही का असा प्रश्‍न शेतकरी व नागरिकांनी उपस्थित केला आहे. चासकमान धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गेली अनेक वर्षापासून गळती होत आहे. याकडे सबंधित विभागाचे मोठे दुर्लक्ष असून कालव्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या कडे लक्ष नसल्याने कालव्याच्या भिंतींवर मोठी झाडे उगवली आहेत. कालवा परिसरातील मोठ्या झाडांच्या मुळ्या कालव्याच्या मातीच्या भिंतीत आरपार गेल्याने ठिकठिकाणी पाणी गळती होत आहे. पाणी गळतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शेती नापीक होत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ही बाबच गंभीर आहे.
मागील वर्षी राजगुरुनगर येथील थिगळस्थळ येथे पाण्याच्या गळतीमुळे फुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. आताही कालवा फुटण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. येथे होणाऱ्या गळतीमुळे कालव्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कालवा पुटण्याची भीती अधिक वाढली आहे. वेळीच येथील पाणी गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

  • डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र या कालव्यातून मोठी गळती सुरू झाली आहे.गळती वेलीचबरोखली नाही तर कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. अलीकडे राज्यात भीषण दुष्काळ आहे. पाणी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे असताना लाखो लिटर पाणी वाया जात असून पाटबंधारे खाते गप्पा का?
    – मनीषा सांडभोर, शेतकरी, राजगुरूनर
  • ज्या ठिकाणी कालव्याची गळती होत आहे त्या ठिकाणची पाहणी केली जाईल. पाहणी नंतर तत्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. कालव्याची गळती रोखण्याचे प्रयत्न केले जातील या ठिकाणी कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाईल. कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने दुरुस्ती करणे अवघड आहे मात्र, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
    – उत्तम राऊत, उपभिबागीय अभियंता, चासकमान धरण
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)