चाळकेवाडीच्या पुष्प पठाराची पर्यटकांना साद

ठोसेघर,  (वार्ताहर) –
कास पुष्प पठारावर देशासह परदेशातील पर्यटक गर्दी करत असताना आता चाळकेवाडीचे पुष्प पठारही पर्यटकांना खुणावत आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडे ठोसेघर धबधब्यापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाळकेवाडीचे पठारही आता विविधरंगी व निरनिराळ्या जातीच्या फुलांनी बहरू लागले आहे. या पठारावर सोनकी, करडू, लाल गोंधणी, निळवंती, सोनटिकली, एक डांगी अशा प्रकारच्या फुलांच्या जाती आढळतात. ठोसेघर धबधबा, दूरवर पसरलेला पवन ऊर्जा प्रकल्प व येथेच बहरलेले चाळकेवाडीचे पठार असा तिहेरी निसर्गाचा आनंद पर्यटकांना घेण्याची संधी चाळकेवाडी पठारावर उपलब्ध झाली आहे.
कास पठारावरावर फुलणाऱ्या रंगीबेरंगी व विविध जातीच्या फुलांप्रमाणे चाळकेवाडी पठारावर देखील विविध जातींची फुले मोठ्या प्रमाणावर बहरत आहेत. चाळकेवाडी पठारावर या निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद काही मोजके पर्यटक घेताना दिसत आहेत. लाल, निळ्या, पिवळ्या रंगाच्या फुलांचा हा गालीच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. कधी धुवाधार पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर, कधी धुके, तर कधी क्षणात पडणारे ऊन या सर्व निसर्गाच्या खेळांचा मोहोक नजराणा या पठारावर पाहयला मिळतो. कास पठारावर पाहायला मिळणाऱ्या फुलांच्या अनेक जाती चाळकेवाडी पठारावरही पाहायला मिळतात. वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी नियोजन करून या पठाराची संवर्धन केल्यास सातारा जिल्ह्याच्या पर्यटन संपदेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाईल. चाळकेवाडी पठाराचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांनी कृती आराखडा करणे गरजेचे आहे. व चाळकेवाडीकडे पर्यटकांची ओढ कशी वाढेल याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)