चाळकवाडीत बोअरवेलमधील इलेक्‍ट्रिक मोटर चोरली

आळेफाटा-चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेतातील बोअरवेल मधील सुमारे 23 हजार रूपये किंमतीची इलेक्‍ट्रिक मोटार व केबल चोरून नेऊन पोबारा केला. ही घटना रविवारी (दि 11) रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली.
चाळकवाडी येथील शेतकरी किसन गेणभाऊ चाळक यांची चाळकवाडी टोलनाक्‍याजवळ शेती आहे. या शेतात त्यांनी बोअरवेल घेतलेला आहे. या बोअरवेलमध्ये त्यांनी दोरीच्या सहाय्याने तीन एचपीची इलेक्‍ट्रिक मोटार टाकून शेतीसाठी पाणी घेतले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी या बोअरवेलमधील ही इलेक्‍ट्रिक मोटार दोरीच्या साह्याने वर काढली व त्यास असलेला प्लॅस्टिक पाईप कापून चोरट्यांनी ही इलेक्‍ट्रिक मोटार व केबल चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेती सांभाळण्यासाठी असलेले शिवदास देविदास राठोड (वय 30, मूळ रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी या घटनेची आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भवारी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)