“चाल तुरु तुरु’ ने घातली रसिक मनांवर भुरळ

पिंपळे गुरव – येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “चाल तुरु तुरु’ या हास्य आणि विनोदाच्या कार्यक्रमाने रसिक मनांवर भुरळ घातली. हास्य अभिनेता अंशुमन विचारे प्रस्तुत या कार्यक्रमास सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माजी नगरसेवक व उद्योजक शंकरशेठ जगताप यांनी प्रतिष्ठान स्थापनेचा उद्देश व्यक्‍त केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आर्थिक विकासासाठी सभासदांना व्यवसाय, राजकीय संधी, विविध मार्गदर्शनपर मेळावे, देवदर्शन यात्रा आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
या वेळी अंशुमान विचारे, श्नेहा कुलकर्णी, पद्मजा पाटिल यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांची मने जिंकली “सांज ये गोकुळी’, “मी रात टाकली’,हृदयी वसंत फुलताना अशी गीते व विविध कोळी गीते सादर करुन या कलाकारांनी रासिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमास ‘ड’ प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर , हर्षल ढोरे, संतोष कांबळे, स्विकृत सदस्य महेश जगताप, उद्योजिका रेखा चोरगे, जयश्री जगताप, शुभांगी जगताप ,सुरेखा मोहिते, शुभांगी कदम ,नगरसेविका माई ढोरे, ऊषा मुंढे, शारदा सोनवणे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, आरती चौंधे, निर्मला कुटे सामजिक कार्यकर्ते दिलीप कांबळे, माऊली जगताप, संतोष ढोरे, शिवाजी निम्हण, सुनील देवकर आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. नामदेव तळपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)