चालू वर्ष अखेरीस लोकसभा निवडणुकांचे मोदीं सरकारचे संकेत?

नवी दिल्ली – चालू वर्षाच्या अखेरीस लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे मोदी सरकारचे संकेत आहेत काय? याच प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच बोलत आले आहेत. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय या वर्षाच्या अखेरीस ते घेतील काय? असा प्रश्‍न आज अनेकांच्या मनात रुंजी घालत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सोमवारचे अभिभाषण ऐकल्यानंतर या प्रश्‍नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांच्या कामगिरीची आढावा घेताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा उल्लेख केला. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कल्पनेला दुजोर देत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, की वारंवार होणाऱ्या निवडणुकांचा विकासावर परिणाम होत असतो.

-Ads-

राष्ट्रपतींच्या या विधानावरून निष्कर्ष काढत कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे म्हणणे आहे, की या वर्षाच्या अखेरीस असे झाले तरी आश्‍चर्य वाटू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)