चालू वर्षी जोरदार पाऊस.. धान्याच्या उत्पादनात वाढ..

सुपा – गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाचे प्रमाण जोरदार होणार असून, धान्याच्या उत्पादनात वाढ होणार मात्र परिसरात रोगराई वाढणार असल्याचे व्हईक भोयरे गांगर्डा (ता. पारनेर) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने वर्तविण्यात आले आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पावसाचा अंदाज व यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात येते. या ग्रामसभेत गेल्या अनेक वर्षांपासून वर्षभरादरम्यान होणाऱ्या पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यात येतो.
रविवारी (दि. 18) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. भैरवनाथ, मारुती व महादेवाच्या मंदिरांचे काम पूर्ण झाले असून कम्पाउंडसाठी गेट व मंदिरांना दरवाजे बसविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यात्रा कमिटीची ग्रामस्थांमधून निवड करण्यात आली. यात्रेदरम्यान गावातील मानाच्या काठ्या मिरवणूक, छबिना मिरवणूक व दुसऱ्या दिवशी हगाम्याचा कार्यक्रम सोडता करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा देत महादेव मंदिरासमोर सभामंडप उभारण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीदेखील यात्रेच्या करमणुकीच्या खर्चास फाटा देत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा पायंडा तरुण वर्गाने याही वर्षी कायम राखला.
यावेळी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलतराव गांगड, माजी सरपंच भाऊसाहेब चांगदेव भोगाडे, माजी उपसरपंच संजय पवार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक पवार, माजी अध्यक्ष दादासाहेब रसाळ, संचालक आप्पासाहेब रसाळ, सुभाष भोगाडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन डोंगरे, बाळासाहेब सातपुते, दादासाहेब जवक, श्रीराम लगड, दत्तात्रेय गांगड, सचिन रसाळ, बाजीराव गांगड, मधुकर लगड, शिवाजी भोगाडे, शिवाजी रसाळ, रावसाहेब रसाळ, सुभाष रसाळ, संतोष रांजणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सुभाष भोगाडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)