चालू खाते तूट जीडीपीच्या 2.8 टक्‍क्‍यांवर

कच्च्या तेलाच्या आयात किमतीत होत आहे वाढ

वित्तीय तूट 5.4 लाख कोटी रुपयांवर

दरम्यान, एप्रिल-जुलै कालावधीतील वित्तीय तूट 5.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. चालू आर्थिक वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या 86.5 टक्‍के ही तूट आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत ती 92.4 टक्‍के होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 2.93 लाख कोटी रुपयांचा कर सरकारकडे जमा झाला आहे. जीडीपीच्या तुलनेत यंदा तूट 3.3 टक्‍क्‍यांवर पोहोचेल असे सरकारला वाटते. मूडीजच्या म्हणण्यानुसार चालू वर्षाचे लक्ष्य पूर्ण करणे सरकारसाठी अशक्‍य दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत आणि अनेक उत्पादनांवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आल्याने कर संकलन घटण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशाची चालू खाते तूट जीडीपीच्या 2.8 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि निर्यातीत वाढ झाल्याने ही तूट वाढेल असे एसबीआयकडून सांगण्यात आले. 2018 च्या 160 दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत व्यापारी तूट 188 अब्ज डॉलर्स पोहोचेल असे बॅंकेच्या यासबंधित अहवालात म्हणण्यात आले.

जुलैमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या आयातीत 57.4 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात 12.4 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती. 2017 मध्ये तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला नव्हता. जून तिमाहीतील कच्च्या तेल आयातीच्या बिलात यंदा 31.7 टक्‍क्‍यांनी घट होईल. गेल्या वर्षाच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या आयातीत कोणताही बदल न झाल्यास यंदा बिलात 5.5 टक्‍क्‍यांनी घट होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चीनमध्ये युआनच्या अवमूल्यनानंतरही मे आणि जूनमध्ये आयातीत वाढ नोंदविण्यात आली. उत्पादक वस्तूंच्या आयातीचे प्रमाण चालू वर्षात समान राहील आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात आणि उत्पादन वर्षाच्या आधारे घटण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)