चालकाला झोप लागल्याने एसटी घुसली दुकानात

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे आज (दि. 17) पहाटेच्या सुमारास साडेतीन वाजण्याच्या दरम्यान अंबड-पुणे दरम्यान एसटीचालकाला झोप लागल्याने एसटी दुभाजकावर आदळून एका ऍटोमोबाइलच्या दुकानात घुसली असून, या बसमधील चालक-वाहकासह एकूण एकोणीस प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शिक्रापूर येथील सूर्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. ऍटोमोबाइलच्या दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
अंबड-पुणे मार्गे प्रवासी वाहतूककरणारी एसटी बस (क्र. एमएच 20 बीएल 3063) घेऊन चालक श्‍यामराव जाधव आणि वाहक भगवान मसुहे पुणे येथे चालले होते. आज (दि. 17) पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळली. बसचा वेग इतका होता की पुढे जाऊन ही बस आबासाहेब दरेकर यांच्या ऍटोमोबाइलच्या दुकानावर आदळली. बस दुकानात निम्म्याहून अधिक आत गेल्याने या दुकानाचे लाखोंचे नुकसान झाले असून, बसमधील चालक आणि वाहकासह एकोणीस प्रवासी जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी बस चालवताना चालकाचा झोपेमुळे बसवरील ताबा सुटला. बसचा वेग अधिक असल्याने दुकानात शिरलेल्या बसमुळे दुकानामागे असलेली तीस फुटांची भिंत देखील सरकली गेली असून, भिंतीच्या बाजूला असलेले लोखंडी ग्रील देखील वाकले गेले आहेत. या घटनेमुळे दुकानाचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस नाईक संजय ढमाल, विजय गाले यांनी घटनास्थळी भेट दिली आणि जखमींना तातडीने शिक्रापूर येथील सूर्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरूर एसटी आगार व्यवस्थापक गोविंदराव जाधव, लेखनिक अर्जुन चव्हाण, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक बेंडाले, एसटी कामगार संघटना अध्यक्ष नितीन देशमाने, श्‍यामराव दौंडकर, राजेंद्र शेळके, नवनाथ लकडे, गणेश रत्नपारखी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट देत घटनास्थळाची पाहणी केली असून, किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना दुसऱ्या वाहनातून पुढे पाठवण्यात आले असून, ज्या प्रवाशांना जास्त लागले आहेत त्यांना पुढील उपचार त्यांच्या गावी उपचार घेत असलेल्या तेथील रुग्णालयाची बिले जवळील एसटी डेपोमध्ये देऊन बिले घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या एसटी वरील चालक श्‍यामराव बबन जाधव (रा. दुसरबीड, ता. शिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि वाहक भगवान भीमराव मसुरे (रा. राममंदिर गल्ली, अंबड) हे दोघे देखील जखमी झाले आहे. याबाबत राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्री चौक आळंदी रोड, भोसरी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश जगताप हे करत आहे.

  • सूर्या हॉस्पिटलमधील जखमींची नावे
    शिवजय गंगाराम माने (वय 6), मनोज मदन बोरावकर (वय 35), आशाबाई शिवदास माने (वय 60 – सर्व रा. चिखली पुणे), तुकाराम पंढरीनाथ कमते (वय 70), नानाबाई तुकाराम कुमते (वय 65 – दोघे रा. शिरसवडी, रामेश्वर), गणपत कोंडे (वय 70), प्रवीण रामदास क्षीरसागर (वय 24 ) रा. अकोला), राहुल ज्ञानदेव जगताप (रा. शास्त्री चौक आळंदी रोड भोसरी पुणे), विष्णु गुलाबराव गिरी (वय 50, रा. वाडेगाव बाळापुर अकोला), शंकर लोखंडे (वय 18, रा. बिबवेवाडी पुणे) यांना सूर्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
  • पुण्यात ससूनमध्ये असलेले जखमी
    बाबुराव मांगुल (वय 75, रा. चौधरी पार्क दिघी पुणे), संजय शामराव निगडे (वय 46, रा. आवळे ता. वाई, जि. सातारा), सादुउल्ला शफीउल्ला खान (वय 42), मधुकर शिवराम घोरकी (रा. वाळूंज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), राजेंद्र मनोहर चिंतामणी (रा. भेकराईनगर हडपसर पुणे), आकाश भरत जाधव (वय 18), वैभव अर्जुन घनके (वय 18), योगेश लक्ष्मण जाधव (वय 18 – सर्व रा. गुंज बुद्रुक, ता. घनसांगवी जालना), धनंजय चंद्रकांत सुपेकर (वय 27 – रा. शिवाजी गल्ली, अंबड) यांना उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)