चालकानेच लुटले दोन लाख रुपये

पिंपरी – पिंपरी येथे एका चालकानेच गाडीच्या ड्रॉव्हरमधून तब्ब्ल दोन लाख रुपये चोरल्याची घटना पिंपरी येथील माणिकबाग परिसरात घडली आहे. ही घटना 18 जुलै रोजी घडली असून शनिवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाम शिवाण्णा शेट्टी (वय-57, रा. आशा इस्टेट, श्रीनगर वागळे इस्टेट, ठाणे पश्‍चिम) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जेसुपांडी चेल्लादुराई नाडार (वय-48, रा. विजयनगर झोपडपट्टी, पश्‍चिम मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हे व्यावसायिक आहेत. ते 18 जुलै रोजी व्यावसायिक कामानिमित्त पिंपरी उद्यमनगर मधील माणिकबाग ऑर्चिड येथे आले होते. त्यावेळी त्यांचा नेहमीच ड्रायव्हर गैरहजर होता. त्यामुळे शेट्टी यांनी त्यांच्यासोबत एक दिवसासाठी जेसुपांडी याला चालक म्हणून आणले होते. जेसुपांडी त्यांच्या तोंडओळखीचा होता. दुपारी साडेचारच्या सुमारास ते माणिकबाग ऑर्चिड इमारतीच्या पार्किंगमध्ये कार लावून इमारतीमध्ये कामासाठी गेले. त्यावेळी कारमध्ये जेसुपांडी एकटाच होता. त्याने कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शेट्टी खाली आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)