चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचे वाचले प्राण

पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथे पावसामुळे लोणी वडगावपीर एसटी बसचे टायर घसरुन बस पलटी होण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र, चालकाने प्रसंगावधानाने गावाजवळील ओढ्यात बस उतरवली अन्‌ प्रवाशांचे जीव वाचवले. पावसाच्या पाण्याने रस्ता ओला होऊन बसचे टायर घसरत चाललेले होते. बसमधील 28 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. परंतु चालक भरत डुंबरे यांनी प्रसंगावधान राखून बसचे स्टेअरिंग रस्त्याच्या दिशेला ओढून एसटी बस ओढ्यात पलटी होण्यापासून वाचवली. बस रस्त्यावर काढण्यासाठी धामणी ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. सरपंच सागर जाधव पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य मिलिंद शेळके आणि ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)