चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस उलटली

मोठी दुर्घटना टळली : 15 विद्यार्थी सुरक्षित


कात्रज-देहुरोड बाह्यवळण महामार्गालगत

पुणे – शालेय विद्यार्थ्यांना नेणारी स्कूलबस कात्रज-देहुरोड बाह्यवळण महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर उलटली. हा अपघात मारूती सुझुकी शो रूमच्या प्रवेशद्वारासमोरील तीव्र उतारावर बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास झाला. बसमधील विद्यार्थ्यांना नागरिकांनी तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविले. या अपघातात कोणताही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कात्रज-देहुरोड महामार्गालगत आंबेगाव बुद्रुक परिसरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना स्कूलबस शाळेत घेवून येत होती. काजत्रहून नऱ्हेच्या दिशेने जाताना बाह्यवळण रस्त्यावरील पोद्दार शाळेसमोरील सर्व्हिस रस्त्यावर बस वळल्यानंतर तीव्र उतार आहे. तेथे बस येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. समोरून दुचाकीवरून एक महिला येत असल्याने बसचालकाने प्रसंगावधान राखून बस डाव्या बाजूच्या दगडावर चढविली. त्यामुळे बस रस्त्यावर उजव्या बाजूला उलटली. शाळेसमोर तसेच शोरूमच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या नागरिक आणि सुरक्षारक्षकांनी बसकडे धाव घेतली. तसेच मुलांना बसबाहेर घेत त्यांना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता कोणासही गंभीर ईजा झालेली नाही. याप्रकाराची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसचे ब्रेक फेल?
प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ अधिकाऱ्यांनी बुधवारी अपघातग्रस्त बसची तपासणी केली. सेवारस्त्यावरील उतारावर बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्कूलबस पलटली. त्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यास गंभीर दुखापत झालेली नाही. हा अपघात का झाला? याची माहिती घेत आहोत. दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
– विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)