चाऱ्यासाठी मेंढपाळांची भटकंती सुरू

नांदूर- उन्हामुळे जनावरे आजारी पडू नयेत म्हणून शेतकरी जनावरांची काळजी घेत आहेत. जनावरे माळरानावर भटकंती करत असताना त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून काही मेंढपाळ पाण्याच्या बाटल्या झाडाच्या सावलीखाली ठेऊन जनावरांची तहान भागवत आहेत.
उन्हाचा कडाका वाढू लागल्याने माळरानावर भटकंती करणारी जनावरे सावलीच्या शोधात झाडाखाली एकत्र येऊन विसावा घेत आहेत. उन्हामुळे जनावरे आजारी पडू नये, यासाठी शेतकरी जनावरांना सावलीत बांधत आहेत. उन्हाचे चटके जाणऊ लागत असून मे महिन्यात प्रचंड उकाडा जाणवूलागला आहे. सध्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. चारा पाण्यासाठी मेंढपाळ वर्ग गरीब कुटुंबातील शेळीपालन करणारी व्यावसायिक भटकंती करताना दिसत आहे.
जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळ आणि शेळीपालन गाय, म्हशी पालन करणारांची वणवण भटकंती सुरु आहे. भटकंती करताना थकलेले मेंढपाळ, शेळीपालन व्यवसाय करणारे एखाघा झाडाचा आसरा घेऊन विश्रांती घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी एखाघा झाडाखाली शेळ्या, मेंढ्या, म्हशी घेऊन आश्रय घेताना दिसत आहेत. बहुतेकजण झाडाच्या सावलीत गवत टाकून शेळ्या चारताना दिसत आहेत. डोंगराळ भागात हिरवेगार गवत सुकलेले असल्याचे चित्र दिसत आहे. जनावरांची भूक भागवण्यासाठी जनावरांना अगदी सहजासहजी उपलब्ध असलेले गवत उन्हाच्या चटक्‍यामुळे जळून खाक झालेले आढळते. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रशन ऐरणीवर येण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी तालुक्‍यात चांगला प्रमाणात समाधानकारक पाऊस झाला होता. परिणामी वाड्या-वस्त्यांवर डोंगरदरी यांसह विविध रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हिरवेगार गवत उगवले होते. या गवतामुळे बहुतांशी बहुतांशी ठिकाणी चाऱ्याचा प्रशन मिटला होता.जवळपास जानेवारी महिन्याअखेरपर्यंत चाऱ्याची उपलब्धता होती. हे गवत जळून खाक झाल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)