चाऱ्यासाठी ज्वारी पिकाचे व्यवस्थापन (भाग दोन )

   ज्वारी पिकाची सुधारित वाणे- एक काप देणारी वाणे- 

पुसा चारी-1- हे वाण भारतीय कृषि संशोधन संस्था,नवी दिल्ली ने तयार केले आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 28 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 8.9 टन आहे. हरियाना चारी(जे-5-73/53): हे वाण पानांवरील लाल टिपके या आजाराला आणि खोड किडीला बळी पडते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 30 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 9 टन आहे. एम.पी चारी: हे वाण 110 दिवसांत पक्व होते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 30 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 10 टन आहे. पुसा चारी:हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 34 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 12.5 टन आहे. एच.सी-136:हे वाण रसाळ आहे आणि क्रुड प्रथिनांचे व पचन योग्यताच्या गुणवत्तेसाठी या आगोदर काढलेल्या वाणांपेक्षा बरेच चांगले आहे.

हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 39 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी10.8 टन आहे. जवाहर चारी-6,यू.पी. चारी-1(आय.एस-4776),पुसा चारी-23,हरियाना चारी-171(एच.सी-171),राजस्थान चारी-1: ही वाणे खोड किडीला प्रतिरोधक आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 45 टन आहे तर कोरड्या चारयाचे उत्पन्न हेक्‍टरी 12.3 टन आहे. राजस्थान चारी – 2(एस.यु.45),यू.पी. चारी-2,पुसा चारी-9,हरियाना चारी-260(एच.सी-260), पंत चारी-3,एम.एफ.एस.एच-3:हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 65टन आहे तर कोरड्या चारयाचे उत्पन्न हेक्‍टरी14 .1 टन आहे. प्रोएग्रो चारी(एस.एस.जी-988):हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 55 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 10.1 टन आहे. एच.सी-308:हे वाण 110 दिवसांत पक्व होते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 44 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 14 टन आहे. पुसा चारी हायब्रीड-106(एच.सी-106):हे वाण 50-60 दिवसांत चाऱ्याकरिता तयार होते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 6.8 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 2 टन आहे.

गुजरात फोडर सोरघम-5:हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 38 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 13.5 टन आहे. हरियाणा जोवार-513(एस-513):हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 47 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 11.9 टन आहे. दोन काप देणारी वाणे – सी.ओ-27: हे वाण 60 ते 65 दिवसांमध्ये पहिल्यांदा कापणीसाठी येते.या वाणाचे खोड हे पातळ असते.पहिली कापणी केल्यानंतर पुन्हा 2-3 वेळा कापण्या घेता येतात(2-3 रटून).हे वाण दुष्काळ सहन करते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 40 टन आहे आणि क्रुड प्रथिनांचे प्रमाण 9.8टक्के एवढे आहे. गुजरात फोरेज सोरघम(ए.एस-16): हे वाण गुजरातमधील आनंद एग्रिकल्चर यूनिवर्सिटी ने 1989 मध्ये गुजरात राज्याकारिता तयार केले आहे. गुजरात फोरेज सोरघम हायब्रीड-1(जी.एफ.एस.एच.-1): हे वाण रसदार आहे आणि जमिनीतील मिठाच्या जास्त प्रमाणाला माफक प्रमाणात सहनशील आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 65 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 25 टन आहे.

अनेक काप देणारी वाणे – एस.एस.जी.59-3(मीठी सुदान): हे वाण दुष्काल आणि त्याचबरोबर पूर परिस्थितीला सहनशील आहे.हे वाण चविसाठी गोड असे आहे व याचे खोड पातळ आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 75 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 22 टन आहे. प्रोएग्रो चारी(एस.एस.जी.988):हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 40 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 10 टन आहे. पी.सी.एच-106(हायब्रीड): हे वाण 3 ते 4 वेळा कापणी देते.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 65 टन आहे. पंजाब सुदेक्‍स चारी-1,हरा सोना855 : या वाणामध्ये हायड्रोसायनिक ऍसिड चे प्रमाण कमी आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 60-65 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 25 टन आहे. सफेद मोती(एफ.एस.एच-92079):हायड्रोसा यनिक ऍसिड चे प्रमाण कमी,हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 65-70 टन आहे. पंत चारी-5(यु.पी.एफ.एस.-32): या वाणाची पौष्टिक गुणवत्ता चांगली असुन 6.58 टक्के एवढे प्रथिनांचे प्रमाण आहे तसेच पाचक गुणवत्ता 47.7 टक्के आहे.या वाणामध्ये हायड्रोसायनिक ऍसिड चे प्रमाण कमी आहे.

(100.4 पी.पी.एम).हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 48.2 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 13.4 टन आहे तर धान्याचे उत्पादन हेक्‍टरी 18 क्विंटल आहे. सी.ओ.एफ.एस-29: हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 170 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 34.5 टन आहे तर धान्याचे उत्पादन हेक्‍टरी 5 क्विंटल आहे. सी.एस.एच-20 एम.एफ(यू.पी.एम.सी.एच-1101):या वाणामध्ये हायड्रोसायनिक ऍसिड(0-120 पी.पी.एम) चे प्रमाण कमी आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 87 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 24 टन आहे.8.5-9.0टक्के एवढे क्रुड प्रथिनांचे प्रमाण आहे. पुसा चारी हायब्रीड-109(पी.सी.एच-109):हि रव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 82 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 21टन आहे. पुसा चारी-615:हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 70 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 19.5 टन आहे तर धान्याचे उत्पादन हेक्‍टरी 12 क्विंटल आहे.तसेच प्रथिनांचे प्रमाण 8.1टक्के आहे.या वाणामध्ये हायड्रोसायनिक एसिड चे प्रमाण 152 पी.पी.एम. आहे.

पंत चारी-6(यू.पी.एम.सी-503):हिरव् या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 80-100 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 25-35 टन आहे तर धान्याचे उत्पादन हेक्‍टरी 18-20 क्विंटल आहे. हरियाणा जोवार-513(एस-513):हिरव्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 49 टन आहे तर कोरड्या चाऱ्याचे उत्पन्न हेक्‍टरी 12 टन आहे. दुहेरी हेतु असणारी वाणे(धान्य आणि चारा) – जे.एस-20,जे.एस-29/1,एस.पी.वी-, आर.एच.हायब्रीड सी.एस.एच.13,सी.एस.व्ही.-15,के- 11 इतर महत्वाची सुधारित वाणे-रूचिरा, फुले अमृता,मालदांडी 35-1, एस.एस.जी.59-3.

लेखक : फारूक रू. तडवी, कुलदिप प्र. शिंदे, 
  पी.एच.डी. रिसर्च स्कॉंलर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)