चाऱ्याचा प्रश्‍न होणार गंभीर

संग्रहित छायाचित्र

दुष्काळी परिस्थितीमुळे जानेवारी 2019 पर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक

पुणे – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जानेवारी 2019 पर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक असून त्यानंतर चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. जूनपर्यंत अडीच हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चाऱ्याच्या नियोजनासाठी 100 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, त्यात पुणे जिल्ह्यातील चार तालुक्‍यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याबरोबरच भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गाळपेऱ्याच्या भागात केवळ चारा उत्पादित केला जावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात जानेवारीपर्यंत पुरेल एवढा चारा असून, जिल्ह्यातील जनावरांची संख्या पाहिल्यास अडीच हजार मेट्रिक टन चारा जून 2019 पर्यंत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील गाळपेरा क्षेत्रावर केवळ चारा पिके घेण्यात यावीत, याव्यतिरिक्‍त कोणतेही पीक घेतले जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

बेकायदेशीर पाणी उपसा
जिल्ह्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र, त्यातून बेकायदेशीर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे त्या परिसरातील वीजपुरवठा सिंगल फेज करा, असा आदेश दिला आहे. बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)