चार सराईत गुन्हेगार तडीपार

पिंपरी – वाकड पोलिसांनी चार सराईतांना दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (रा. काळखडक झोपडपट्टी, वाकड), बाळू महादेव वाघमारे (वय-28, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड), सचिन वसंत खलसे (रा. बापुजीबुवानगर, थेरगाव) व विशाल शहाजी कसबे (रा. काळखडक, वाकड) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत.

-Ads-

चारही आरोपींनी परिसरात गंभीर गुन्हे करत दहशत पसरवली होती. या पार्श्‍वभूमीवर वाकड पोलिसांच्या वतीने परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे गोपनीय अहवाल सादर केला होता. त्यानुसार नम्रता पाटील यांनी चारही आरोपींना दोन वर्षासाठी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)