चार वर्षांपासून फरार आरोपीला बेड्या

पिंपरी – जमीन गैरव्यवहार प्रकरणी चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

अशोक मल्लु पिल्ले असे अटक आरोपीचे नाव आहे. पिल्ले व त्याचे सहकारी सरताज शेख, महेश शिंदे, संजय आल्हाट यांच्यावर 2015 मध्ये हा फसवणुकीचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील वृद्ध दाम्पत्य थॉमस व त्यांची पत्नी सुझन यांची कोंढवा बुद्रुक येथील 40 गुंठे जमीन ही आरोपी पिल्ले याने स्वतःच्या बनावट पॉवर ऍटर्नी तयार करून त्यातील 20 गुंठे जागा सरताज हुसेन शेख याला 1 कोटी रुपयाला परस्पर विकत दाम्पत्याची फसवणूक केली. यापूर्वीही पिल्ले याच्यावर 2015 साली गुन्हा दाखल होता तेव्हापासून हा आरोपी फरार होता. पिल्ले हा वल्लभनगर एस. टी. स्टॅन्ड परिसरात असल्याची खबर पोलीस नाईक गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार सापळा रतच पथकाने पिल्ले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.

गुन्हे शाखा युनीट दोन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ. पोलीस नाईक अमित गायकवाड, प्रमोद हिरळकार, सुनील चौधरी यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)