चार वर्षांत इंदापुरातील 19 शाळा बंद

रेडा- सध्या इंदापूर तालुक्‍यात 84 माध्यमिक विद्यालय आहेत मी सत्तेवर असताना अनेक माध्यमिक शाळा व नवीन तुकड्या काढल्या मात्र मागील चार वर्षांत तालुक्‍यात एकही नवीन माध्यमिक व महाविद्यालय निघाले नाही.तसेच वाढीव तुकड्या करीता मान्यता दिली नाही. उलट 19 प्राथमिक शाळा बंद केल्या आहेत, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांचे नव न घेता माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर व श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा यांच्या संयुक्‍त विद्यमाने इयत्ता दहावी, बारावी व एनएमएमएस परीक्षेमधील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळांचा सत्कार समारंभाचे आयोजन इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते, त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, राज्य सहकारी संघाचे संचालक मंगेश पाटील, माजी सभापती विलास वाघमोडे, बावड्याचे सरपंच किरण पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, भरत शहा, महेश रेडके, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, पांडुरंग शिंदे, मीना मोमीन, सुवर्णा नितीन मखरे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, यावर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेत तालुक्‍याचा निकाल 91 टक्के लागला आहे. इतर तालुक्‍यातील शाळांपेक्षा इंदापूरची गुणवत्ता वाढली आहे. येणाऱ्या भविष्य काळात स्पर्धेत टिकायचे असेल, तर शिक्षण घेतले पाहिजे शिक्षणात गुणवत्ता मिळवयाची असेल, तर अभ्यासात चिकाटी व मेहनत घेतली पाहिजे. सध्या मोठे आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिक्षण हे नुसते नोकरी व पदासाठी नसून उत्तम गुणवान नागरिक बनण्यासाठी आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. तुम्ही शिक्षण घेवून कितीही मोठे झाला तरी आई-वडील, शिक्षक व शाळेला विसरू नका त्यांचा सन्मान करा असे आवाहन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

  • त्या विद्यार्थ्यांचा खर्च करणार
    ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही त्यांनी माझ्या कडे यावे त्यांना प्रवेश मिळवून देण्यात येईल. तसेच इंदापूर तालुक्‍यातील ज्या गरीब घरच्या विद्यार्थ्यांना यूनियन पब्लिक सर्विस कमीशन (यूपीएससी)च्या परीक्षेला बसायचे आहे, त्यासाठी दिल्लीत जाऊन क्‍लास लावयाचा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च मी स्वत: करणार असल्याची ग्वाही राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)