चार लाखांचे सामान चोरीला

पिंपरी – चाकण येथे गोडाऊनचे शटर उचकटून 4 लाख 11 हजार रुपयांचे सामान चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि. 1) उघडकीस आली.

विजयन नारायणन नायर (रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर यांचे चाकण येथे गोडाऊन आहे. त्यामध्ये ते टाटा कंपनीचे असेम्ब्ली स्टेशनर ठेवतात.

शुक्रवारी गोडाऊनमध्ये एकूण 732 स्टेशनर ठेवले होते. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नायर यांनी गोडाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमध्ये ठेवलेले असेम्ब्ली स्टेशनरचे 4 लाख 11 हजार 210 रुपये किमतीचे 732 नग चोरून नेले. शनिवारी सकाळी नायर गोडाऊनकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)