चार बॅंकांचे विलीनीकरण होणार नाही- शिव प्रताप शुक्‍ला

 सिंडिकेट, कॅनरा, विजय, देना बॅंकांचे स्वतंत्रपणे काम

नवी दिल्ली -कॅनरा बॅंक आणि देना बॅंक यासह सार्वजनिक क्षेत्रातील चार बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बॅंक, कॅनरा बॅंक, विजय बॅंक आणि देना बॅंक या चारपैकी कोणत्याही बॅंकेने अर्थ मंत्रालयाकडे त्यांच्या विलीनीकरण अथवा एकत्रीकरणासंबंधाने कोणतेही सादरीकरण केलेले नाही, असा खुलासा अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी केला.

गेल्या वर्षी फेब्रुवारी 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय स्टेट बॅंकेत तिच्या पाच सहयोगी बॅंकांसह, भारतीय महिला बॅंकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि 1 एप्रिल 2017 पासून हे विलीनीकरण अमलातही आले. तथापि त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बॅंकांच्या एकत्रीकरणासंबंधाने मुद्दा सरकारपुढे प्रस्तावित अथवा विचाराधीन नसल्याचे त्यांनी सूचित केले.

स्टेट बॅंक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅंक ऑफ पतियाळा आणि स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंक अशा सहा बॅंका स्टेट बॅंकेत एप्रिल 2017 पासून विलीन केल्या गेल्या आहेत. या विलीनीकरणातून जगातील अव्वल 50 बॅंकांपैकी एक बॅंक म्हणून स्टेट बॅंकेची वर्णी लागू शकली आहे. एकूण 37 कोटींचा ग्राहक पाया, 24,000 शाखा आणि सुमारे 59,000 एटीएम असा बॅंकेचा देशव्यापी पसारा फैलावू शकला आहे. यापूर्वी प्रथम 2008 मध्ये स्टेट बॅंक ऑफ सौराष्ट्र आणि त्यानंतर दोन वर्षांनी स्टेट बॅंक ऑफ इंदूर या बॅंका स्टेट बॅंकेत विलीन केल्या गेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)