चार दिवसांनी पावसाने घेतला “ब्रेक’

पिंपरी – गेल्या चार दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि सायंकाळी पाऊस असा क्रम सुरू होता. बुधवारी उकाडा तर होता परंतु पावसाने ब्रेक घेतला.

पिंपरी-चिचवड शहराच्या विविध भागात गेल्या चार दिवसांपासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस पडत होता. तत्पूर्वी दिवसभर उकाडा जाणवत होता. बुधवारी देखील दिवसभर ऊन आणि उकाडा होता, परंतु रोजप्रमाणे सायंकाळी पाऊस झाला नाही. पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या आकड्यानुसार कमाल तापमान 33.6 अंश सेल्सियस इतके होते, तर किमान तापमान 20.6 अंश इतके होते.

-Ads-

मॉन्सून परतीच्या प्रवासावर असताना सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहेत. पुढील संपूर्ण आठवडा असाचा उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. 9 ऑक्‍टोंबरपर्यंत कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 20 अंश इतके राहण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच संपूर्ण आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता असल्याने उकाडा जाणवतच राहणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)