चार गावांच्या सीमेवर फुलला भक्‍तीचा मळा

  • श्रीगणेश मंदिरात काकड आरतीने भक्‍तीमय पहाट

तळेगाव ढमढेरे – तळेगाव- न्हावरा रोडलगत असणाऱ्या गणेश मंदिरात गेल्या सात वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सूर असून भाविकांची पहाटेपासून काकड आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही काकड आरती चार गावांच्या शिवेवरील तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा, कासारी, निमगाव म्हाळुंगी या ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
रूप पाहता लोचनी ! सुख झाले ओ साजणी ! तो हा विठ्ठल बरवा ! बहुता सुकृताची जोडी ! म्हणोनी विठ्ठली आवडी ! सर्व सुखाचे आगर ! बाप रखुमा देवीवर ! अभंग आणि किर्तनाच्या सुरेल गायनाने पहाटेपासून भक्‍तिमय वातावरण मंगलमय होत आहे. सकाळपासून सलग तीन तास काकड आरती, गौळणी, आरती घेतल्यानंतर प्रसाद दिला जात आहे. पूर्वी या ठिकाणी फक्‍त गणपतीची मूर्ती होती. परंतु स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम होतात. सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात उत्कृष्ट शिक्षण भजन, गायन व कीर्तनाची गोडी लागवी, यासाठी चैतन्याचा मळा बहरतो. गणेशनगर (गणपती माळ) तळेगाव – न्हावरा रस्त्यावरील गणेश मंदिरात परिसरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. या परिसरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून संत परंपरेची विचारधारा समजात रुजली आहे.
तालुक्‍यात गावोगावी काकड आरतीची परंपरा जपली जात आहे. आठ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असून त्याला प्रतिसाद मिळत आहे. हे देवस्थान तळेगाव, कासारी, निमगाव,टाकळी या चार गावांच्या सीमेवर जागरूक देवस्थान आहे, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

  • कार्यामाला ह. भ. पं. महाराजांनी व येथील नागरिकांनी मोठेपणा दाखवून नाव न छापण्याचा खूप चांगला निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. सर्वजन भक्‍तिभावाने आपआपले काम चोखपणे पार पडतात. प्रत्येकानी कामाची जबाबदारी घेतली आहे. सर्वजण मनोभावे सेवा करतात. आध्यत्मिक क्षेत्राची आवड निर्माण झाल्यापासून अनेक विद्यार्थ्यांना भजन, हार्मोनियम, गायन शिकवणीसाठी वर्ग घेण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत वळणे लागलेली आहेत. ते भविष्यात मोठे कीर्तनकार होण्याची स्वप्न पाहत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)