चारी केल्याप्रकरणी चार सराईतांना पोलीस कोठडी

पुणे- महिंद्रा लोगन कारची चोरी केल्याप्रकरणी चार सराईतांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही.थोडगे यांनी दिला आहे.
शुभम राजेंद्र तरस (वय 21, रा. देहुरोड, ता. मावळ), योगेश रघुनाथ तळपे (वय 28, रा. तळपेवाडी, पो. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), धननाथ ऊर्फ भावड्या काशिनाथ भावनाथ (वय 22, मु.पो.केळी, ओतुर, ता. अकोले, जि. अहमदनगर) आणि दिलीप नागेश भवारी (वय 23, रा. मेदणकर वाडी, चाकण, ता. खेड) अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत मधुसुदन आनंदराव पाटील (वय 23, बालेवाडी स्पोटर्स कॉम्प्लेक्‍स, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्री घडली. फिर्यादींनी घरासमोर पार्क केलेली महिंद्रा लोगन लांबविण्यात आली होती. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघे सराईत आहेत. त्यांच्याकडून अशोक लेलॅंड टेम्पो, महिंद्रा कंपनीचा मॅक्‍स टेम्पो, महेंद्रा कंपनीची बोलेरो जीप आणि तब्बल सात दुचाकी जप्त करण्यात आली आहे. चौघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्हात चोरी केलेली महिंद्रा लोगन कार कर्नाटक येथे विकली असल्याचे सांगत आहेत. तपास करून ती गाडी जप्त करण्यासाठी, आरोपींची वाहन चोरण्याची आंतरराज्यीय टोळी आहे. त्यांचे आणखी काही साथीदार आहेत, त्यांच्या शोधासाठी, अटक केलेल्या चौघांवर चाकण, घारगाव, सिन्नर, नाशिक, आळेफाटा परिसरात दहा वाहने चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास करण्यासाठी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)