चारा पिकवण्यासाठी 1 रूपया भाडेपट्ट्याने जमिनी 

संग्रहित छायाचित्र.....

पाणलोट क्षेत्रातील जमिनींचा होणार वापर 

प्रत्येक जिल्ह्यात 2 हजार हेक्‍टर 
वैरण पिकासाठी जलाशयातील पाणी देखील विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा चारा शेतकछयांना स्वतःच्या पशुधनासाठी उपयोगात आणता येईल. अतिरिक्तचा चारा शिवारातील इतर दुग्ध उत्पादक शेतकछयांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 2 हजार हेक्‍टर क्षेत्रावर चारा पिके, वैरण पिकांची लागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारा टंचाई निवारणासाठी लाभार्थी निवड, समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. गाळपेर जमिनीवरील वैरण विकास कार्यक्रम हा दुष्काळ कालावधीपुरताच मर्यादित राहणार आहे. 

मुंबई: सरासरीपेक्षाही यंदा पाऊस कमी पडल्याने राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे खरिपाची पिके वाया गेली असून पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने जनावरांच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील जलाशय, तलाव क्षेत्राजवळील जमीन शेतकऱ्यांना चारा पिकविण्यासाठी नाममात्र 1 रूपया भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये याआधीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. दुष्काळी तालुक्‍यांमध्ये उपाययोजना सुरूही करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत उन्हाळ्यातील चाराटंचाई लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित तालुक्‍यातच किंवा जवळच्या तालुक्‍यातच चारा उपलब्ध व्हावा, असे नियोजन करण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने बुडीताखालील जमिनी मोकळ्या पडलेल्या असतात. अशा जमिनी वैरण पिकांच्या लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असतात. या जमिनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र 1 रूपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या जमिनीवर जनावरांसाठी मका, ज्वारी, बाजरी अशी वैरण व चारा पीके घेण्यात येतील. त्यासाठी विविध योजनांमधून बियाणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)