चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर

संगमनेर: चारा पाण्याच्या शोधात ऐन पावसाळ्यात रानमाळ भटकण्याची वेळ संगमनेर तालुक्यातील साकुर व परिसरातील मेंढपाळ व्यावसायिकावर आली आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मेंढ्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून मेंढपाळ स्थलांतर करत असल्याचे चित्र सध्या साकुर परिसरात दिसून येत आहे.

आजही परंपरागत मेंढीपालन व्यवसाय तालुक्यातील साकुर, मांडवे, बिरेवाडी, कौठे मलकापूर, शिंदोडी, हिवरगाव पठार, हिरेवाडी, दरेवाडी व परिसरातील गावांमध्ये परंपरागत केला जातो. पावसाळ्यानंतर काही दिवसांनी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. दरवर्षी साधारणपणे दिवाळीनंतर पावसाचा सांगावा येईपर्यंत मेंढपाळांची चारा, पाण्यासाठी भटकंती सुरु असते. यंदा अत्यंत कमी पाऊस असल्याने पावसाळ्यातच पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आम्हाला स्थलांतर करावे लागत असल्याचे महिला मेंढपाळ लहानुबाई कुदनर, अर्जुन भगत, संगीता सोडनर, हिराबाई झिटे, ताराबाई खेमनर यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)