चारा नसल्याने मेंढपाळांची वणवण

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागात यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. जनावारांसह मेंढापाळांनाही चाऱ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. चिंबळी, कुरुळी परिसरात दरवर्षी जानेवारीच्या सुरुवाती पासून मेंढापाळ दाखल होत असतात. दरम्यान, या परिसरात गेल्या 15 वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने पडीक जमिनी शिल्लक नाही. तसेच इंद्रायणी नदीचे पाणी दूषित झाल्याने व डोंगर दऱ्यात हिरवा चारा, कांदा पीक कमी प्रमाण घेतले जात असल्याने मेंढपाळ शेळ्या-मेढ्यांना चारा म्हणून बाभळीचा पाला देत आहे. त्यातच या परिसरात कांदा काढणी सुरू झाली नसल्यामुळे मेढांपाळाना हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. तर इंद्रायणी नदीचे पात्र जलपर्णीने झाकोळले असल्याने मेंढपाळांना पाण्याचीही शोधाशोध करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)