चारा टंचाई : कत्तलीसाठी दलालांची पशुधनावर नजर

पाच तालुक्‍यातील चारा संपला : साडेपाच लाख पशुधनावर उपामारीची वेळ

नगर: नगर तालुक्‍यासह पारनेर, कर्जत, जामखेड आणि पाथर्डी तालुक्‍यातील जनावरांचा चारा संपला आहे. यामुळे साडेपाच लाखांपेक्षा जास्त जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाऱ्या अभावी काही शेतकऱ्यांनी जनावरांचे स्थलांतर सुरू केले आहे. दुष्काळाचा आणि चारा टंचाई फायदा घेत काही दलालांनी डोके वर काढून या जनावरांची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कत्तलीसाठी आगामी काळात जनावरांची तस्करी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा प्रशासनाच्या टंचाई आराखड्यानुसार डिसेंबरपर्यंत नगर, पारनेर, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्‍यातील चारा संपले असे म्हटले गेले होते. त्यानुसार या पाचही तालुक्‍यांमध्ये चारा टंचाई तीव्र होऊ लागली आहे. थंडी जशी ओसरत आहे, तशी चारा टंचाई उग्र रुप धारण करत आहेत. शेतकऱ्यांनी चाऱ्याच्या शोधासाठी स्थलांतर सुरू केले आहे. काहींना यश येऊ लागले आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात आले आहे. छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

जिल्हा प्रशासन टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना सुरू करण्यातच गुंतले आहे. परंतु कागदोपत्री आराखडे मांडले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कृती होताना दिसत नाही. चारा टंचाईने तीव्र स्वरुप धारण केले आहे. पशुधनाची कत्तलखान्याकडे घेऊन जाण्यासाठी जिल्ह्यात दलाल सक्रिय झाले आहेत. दुष्काळी काळात कमी भावाने जनावरांची खरेदी करता येते. शेतकरी देखील हतबल असतो. त्याचाच फायदा दलाल घेत आहेत. हे रोखण्यासाठी छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. नगर, पारनेर, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्‍याती डिसेंबरपर्यंत पुरेल इतकाच चारा होता. तो संपला आहे. या तालुक्‍यांच्या खालोखाल कोपरगाव, श्रीगोंदे व श्रीरामपूर तालुक्‍यातील चारा जानेवारीपर्यंत पुरेल इतका आहे. फेब्रुवारी संगमनेर आणि राहाता तालुक्‍यातील चारा संपणार आहे. नेवासे आणि शेवगावमधील चारा मार्चपर्यंत पुरेल इतकाच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)