चारा टंचाईमुळे शेळ्या-मेंढ्यासाठी विकत खाद्य

गराडे-पुरंदर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात चारा टंचाई मोठा प्रमाणात झाल्यामुळे मेंढपाळांना विकत खाद्य आणून जनावरांचे धन जगवत आहे.
बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्‍यातील मेंढपाळ पुरंदर तालुक्‍यात येऊन भटकंती करून सुका चारा चारुन जनावरांची कशीबशी भूक भागवत आहेत; परंतु या भागात जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे माळरान, शेती याला तारेचे कंपाऊंड घातलेले आहेत. तसेच सर्वच डोंगर भागात वणवा लागल्यामुळे गवत, झाडे झुडपे नष्ट झाल्यामुळे चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील मार्केटयार्ड भाजी मंडईतून कोबी, फ्लॉवर, कांदा, हिरवा पाला दररोज विकत आणून शेळ्या-मेंढ्या जगवत आहे, असे मेंढपालक बिरा लकडे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्‍यात चाराटंचाई मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून जनावरांना आवश्‍यक असणारा चारा सहजासहजी उपलब्ध होत नाही. मेंढपाळांना तर शेतात रानोमाळ भटकून या महागाईतही मेंढ्या, बकरी सांभाळावी लागत आहेत. भर ऊन्हात रिकामे झालेल्या शेतात मिळेल तो चारा, पाला, पाचोळा चारून बकरी सांभाळावी लागतात. गावाच्या अवती-भवती असलेल्या शेतशिवारात व डोंगरात बकरी सोडून द्यावी लागतात. तसेच चारा उपलब्ध नसल्याने बकरी जागेवर थांबत नाही. त्यासाठी चांगलीच कसरत जनावरांबरोबर आमची होत आहे. डोंगरावर पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी ही वणवण करावी लागत आहे. असे योगेश लकडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)